कृषी विभागातर्फे शेती शाळेत उत्सव स्वातंत्र्याचा उत्सव शेतीशाळेचा उपक्रम साजरा

Date:

अमळनेर तालुक्यातील मालपुर येथे कृषी विभागामार्फत कापूस पिकातील किड रोग सल्ला प्रकल्प योजनेअंतर्गत कापूस पिकाची शेती शाळा संपन्न झाली यावेळी कापूस व इतर पिकातील किड व रोग यांची ओळख त्यावरील उपाय योजना यावर मार्गदर्शन करण्यात आले,
या शेतीशाळा वर्गात सहाय्यक कृषी अधिकारी चोपडा असून दिनेश देविदास पाटील यांच्या संकल्पनेतून उत्सव स्वातंत्र्याचा उत्सव शेती शाळेचा ही नावीन्यपूर्ण संकल्पना राबविण्यात आली. या अंतर्गत शेती शाळेचे सर्व पुरुष व महिला शेतकरी उपस्थित होते, शेती शाळेचे वैशिष्ट्य म्हणजे शेतकऱ्यांनी राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक म्हणून वेगवेगळ्या राज्यांच्या पारंपरिक वेशभूषा परिधान केला होत्या,
तर महिला भगिनींनी तिरंगा रंगाची साडी परिधान करून राष्ट्रीय एकात्मतेबरोबरच शेती शाळेतील एकात्मता व त्या एकात्मतेतून शेती उत्पादनात होणारी वाढ याचा संदेश दिला,
शेती शाळेत पुरुष व महिला शेतकऱ्यांनी निरीक्षणे सादरीकरण या सक्रिय सहभाग घेतला, गावापासून ते शेतीशाळा क्षेत्रापर्यंत सवाद्य मिरवणूक हे सर्वांच्या आकर्षणाचे केंद्र ठरली,
यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री कुरबान तडवी प्रांताधिकारी नितीन कुमार मुंडावरे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले, प्रसंगी उपविभागीय कृषी अधिकारी चंद्रशेखर साठे, तंत्र अधिकारी पी व्ही निकम, तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत ठाकरे, दीपक साळुंखे, प्रशांत देसाई यांनी प्रत्यक्ष प्रक्षेत्रावर शेतकऱ्यांचे गट करून त्यांना मार्गदर्शन केले,
शेती शाळेच्या उत्कृष्ट आयोजनाबद्दल मालपूर येथील सहाय्यक कृषी अधिकारी महेंद्र पवार यांचा मान्यवरांनी विशेष सन्मान केला,
चोपडा येथील सहकारी जितेंद्र सनेर व महेश सनेर यांच्या सोबतच कार्यक्रम यशस्वीतेसाठी अमळनेर तालुक्यातील सर्व मंडळ कृषी अधिकारी, उप कृषी अधिकारी, सहाय्यक कृषी अधिकारी बंधू भगिनींचे सहकार्य लाभले

ई खबर मीडिया के लिए जळगाव जिल्हा के प्रतिनिधी बशीर परमान तडवी की रिपोर्ट

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Share post:

Subscribe

spot_imgspot_img

Popular

More like this
Related

‘फरीदाबाद मॉड्यूल के डॉक्टरों से हमारा कोई ताल्लुक नहीं’, अल-फलाह यूनिवर्सिटी ने जारी किया बयान

फरीदाबाद की अल-फलाह यूनिवर्सिटी ने ‘फरीदाबाद मॉड्यूल’ केस में...