एक नवीन यशोगाथा घडविणारा
जिद्द आणि चिकाटी, परिश्रमाच्या बळावर यशाला गवसणी घालणारा
सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद कठोरे
यावल तालुका प्रतिनिधी,
बशिर तडवी,[कधी काळी शेतामध्ये जाऊन मोलमजुरी करणारा नवयुवक तरुण आज पोलीस वर्दीत कायदा व सुव्यवस्थेची धुरा सांभाळतो.]
परिचय :- जळगाव जिल्ह्यातील वढवे (तालुका मुक्ताईनगर ) या छोट्याशा गावातील शेतकरी कुटुंबात जन्मलेले प्रमोद कठोरे त्यांचे वडील स्व. रामकृष्ण कठोरे मातोश्री शांताबाई यांनी अनुकूल परिस्थितीमध्ये सुद्धा सात मुलांचा सांभाळ व संगोपन करून त्यांना शिकवलं. खऱ्या अर्थाने मातोश्री शांताबाई या अनमोल असा हिरा प्रमोद कठोरे शिस्तीचे व कष्टाचे धडे देऊन पोलीस दलात चमकवले.
शिक्षणातून उभे राहिलेले स्वप्न आणि ध्येय
प्राथमिक व माध्यमिक शिक्षण चांगदेव माध्यमिक विद्यालयात तर पदवी शिक्षण मुक्ताईनगर येथे झाले. शाळेत असतानास त्यांना विशेष वाचनाची आवड व पोलीस होण्याची खूप इच्छा होती. पोलीस होण्यासाठी ते रात्रंदिवस स्वप्न बघत होते आणि ते खऱ्या अर्थाने सत्य केव्हा होईल यांचीच त्यांना प्रतीक्षा होती. हे स्वप्न पूर्ण करण्याकरता त्यांनी वाचनालयात जाऊन पुस्तकांचा अभ्यास सुरू केला, त्यांच्याकडे कोचिंग क्लासेस लावण्यासाठी शहराकडे जाण्यासाठी एवढा पैसा उपलब्ध न होता. त्यांच्याकडे होते फक्त जिद्द आणि ध्येय हेच त्यांचे मित्र ठरले.
पहिल्याच प्रयत्नात राज्यसेवा पूर्व परीक्षा पास
महाराष्ट्र राज्यसेवा २०१३ या परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात त्यांनी यशाला गवसणी घातली. त्यांची पहिलीच नियुक्ती पुणे शहरात झाली, तिथून नंतर नाशिक आणि नंतर जळगाव ठिकठिकाणी त्यांनी कार्य केले. कायदा व सुव्यवस्था राखण्यासोबत गुन्हेगारी नियंत्रण जनजागृती उपक्रम आणि नागरिकांची थेट संवाद यावर त्यांनी जास्त भर दिला.
कुटुंबाची खूप मोलाची सात व हातभार
पोलीस सेवेत कामाचा ठरलेला वेळ कधीच नसतो. कधी भल्या पहाटे कधी मध्यरात्रीत कधी सुट्टीच्या दिवशी कुठेही कधीही हजर राहावे लागतं. या सर्व धगधगीत पत्नी सौ कविता कठोरे यांची खूप मोलाची साथ व त्यांचा आधार ठरला. मुलगा दक्ष आणि मुलगी मलाईका यांच्या शिक्षणापासून घरातील सर्व जबाबदाऱ्या त्या समर्थपणे सांभाळतात. प्रमोद कठोरे नेहमीच सांगतात ” माझं कुटुंबच हे माझा आधार हीच माझी शक्ती यांच्यामुळे सर्व काही शक्य ”
व्यक्तिमत्त्वातील ठसा आणि कार्यशैली
प्रमोद कोठारे यांना नेहमीच नीटनेटकेपणा शिस्त, स्वच्छता हे खूप आवडते त्यात ते कधीच तडजोड करत नाही. सर्व त्यांच्या सहकाऱ्यांशी सकारात्मक वातावरण तयार करून प्रत्येकाशी सन्मानाने आणि समस्यांकडे तर्क वितर्क दृष्टिकोनातून पाहणं ही त्यांची कार्यशैली आहे. गुन्ह्याचा तपास करताना अचूक माहिती संकलन जलद निर्णय क्षमता यासाठी ते ओळखले जातात.
सध्याची नियुक्ती आणि जनतेचा विश्वास
सध्या प्रमोद कोठोरे हे पहूर तालुका जामनेर येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत आहे. त्या ठिकाणी सुद्धा ते जनतेचा विश्वास संपादन करून त्यांचे स्थान जनतेच्या मनामध्ये आपुलकीचे झालेले आहे. त्यांच्या कार्यशैलीत शिस्त प्रामाणिकपणा आणि संवेदनशीलता या तिन्ही गोष्टींच्या संतुलन दिसून येते.
तरुणांसाठी प्रेरणास्थान
प्रमोद कोठारे यांची कथा ही केवळ यशोगाथा नाही तर ते एक यशोगाथा गुंफणारे अवलिया आहे त्यांनी आपल्या आयुष्यात तरुणांना असे दाखवून दिले आहे की संघर्ष, अपयश, परिस्थितीतील अडथळे या सगळ्यांवर कशी मात करता येईल. त्यांचा तरुण पिढीला एकच सांगणे आहे “स्वप्न मोठे बघा, योजना आखा कठोर परिश्रम करा ” नक्कीच यश तुमच्या पदरात पडेल.
दिव्यांगांविषयी प्रेम व आपुलकी
प्रमोद कोठोरे यांना सदैव दिव्यांगांविषयी प्रेम व आपुलकी राहिलेली आहे.त्यांना ते योग्य ते मार्गदर्शन व मदतीचा हात त्यांच्या पाठीशी सदैव आहे. दिव्यांग बांधवांचा सामाजिक कार्यक्रम असला की त्यावेळी ते वेळात वेळ काढून उपस्थित राहतात.
कायदा आणि सुव्यवस्था टिकवण्यासाठी कटिबद्ध
सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद कठोरे हे नाव जळगाव जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या चर्चेत नेहमीच आदराने घेतले जाते. पहुर तालुका जामनेर येथे सध्या सेवत असलेले कठोरे यांनी आपल्या कर्तव्यनिष्ठा प्रामाणिकपणा आणि चिकाटीच्या जोरावर एक वेगळी छाप निर्माण केलेली आहे. ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही पातळ्यांवर त्यांनी कार्य करताना कायदा अंमलबजावणी सोबतच लोकांमध्ये विश्वासाचे वातावरण तयार करण्यावर भर दिला. पोलीस हा फक्त दंडूका उभारणारा अधिकारी नसून तो समाजाचा मित्र मार्गदर्शक आणि रक्षक आहे अशी प्रतिमा त्यांची आहे
ई खबर मीडिया के लिए जळगाव जिल्हा के प्रतिनिधी बशीर परमान तडवी की रिपोर्ट


